Viram chinh in Marathi विरामचिन्हे मराठीमध्ये यामध्ये आपण मित्रांनो निरनिराळ्या प्रकारचे नवीन विरामचिन्हे बघणार आहे.
जेव्हा आपण विराम चिन्हांबद्दल बोलतो तेव्हा आपल्याला लक्षात आलं पाहिजे की मराठी व्याकरणामध्ये विरामचिन्हाचे फार महत्त्व आहे.
जेव्हा एखादा लेखक लिखाण करतो ,तर तो समोरच्या व्यक्तीला उद्देशून बोलत असतो.
त्यावेळी वाक्याचे अर्थ व्यवस्थित रितिने आणि वाचकाला कुठे थांबायचे कुठे विराम घ्यायचा कोणत्या शब्दावर जोर द्यायचा हे कळण्यासाठी किंवा समजण्यासाठी विरामचिन्हे वापरतात.
मराठी भाषेमध्ये विरामचिन्हे वापरली जायची नाही, फक्त एक लंब दंडाकार रेष (|) वापरण्यात येत होती.
जेव्हा थॉमस कँडी नावाच्या शब्दकोशाकाराने देवनागरी लिपी मध्ये लिहायला सुरुवात केली त्यावेळी त्यांनी विरामचिन्हांचा पहिल्यांदा उपयोग केला.
विरामचिन्हे हे शब्दाला अगदी लागून येतात त्यामध्ये कोणतीही जागा सोडायची नसते .
भाषा लिखाणाला काही नियम ठरवून दिलेले आहे परंतु आपल्याला नियमाप्रमाणे वागणे किंवा पाठ करणे इत्यादी आवश्यक नसते जर सहजतेने आपण कोणतीही भाषा बोललो तर विरामचिन्हे हे आपल्याला उपयोगात येतात व त्यासाठी कोणतेही पाठांतर करावे लागत नाही .
वाचकाला शब्दांचा अर्थ वाक्याचा अर्थ योग्य रीतीने काळावा यासाठी विरामचिन्हे फार आवश्यक आहे.
विरामचिन्ह याचा विचार करताना आपल्याला प्रमाण लेखनाचा विचार करणे आवश्यक आहे जेव्हा आपण लिहितो तेव्हा आपल्याला माहीत नसते की व्यक्ती कोणत्या देशाचा आहे त्यामुळे विरामचिन्हांचा वापर करून आपण भाषा शुद्धलेखनाचा विचार करतो.
मराठी व्याकरण :-अनुक्रमणिका
viram chinh in marathi chart
Types of viram chinh in marathi |विराम चिन्ह व त्याचे प्रकार उदाहरणासह
१ .पूर्णविराम (.)
२ . स्वल्पविराम ( ,)
३ . अपूर्णविराम(:)
४. अर्धविराम ( ; )
५ . उद्गारचिह्न (!)
६ . प्रश्नचिह्न ( ? )
७ . एकेरी अवतरणचिन्ह (‘…’)
८ . दुहेरी अवतरण चिन्ह (“…”)
९. संयोग चिन्ह (-)
१०. अपसारण चिन्ह
११ . (तिरपा डॅश) (/)
१२. अवग्रह(ऽ)
top २० Marathi Motivational Book
१ .पूर्णविराम (.)
जेव्हा वाक्य संपते व वाक्याचा अर्थ पूर्ण झालेला असतो त्यावेळी शेवटी एक( .) वापरून वाक्य पूर्ण होतो तेव्हा पूर्णविराम वापरतात .इंग्रजीमध्ये यालाच फुल स्टॉप असं म्हणतात .full viram chinh in marathi
उदा.
- मी जेवण करतो.
- मी आज बाहेर फिरायला गेलो होतो.
- मला स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायचा आहे.
२ .स्वल्पविराम ( ,)
एकाच प्रकारचे अनेक शब्द एकामागून एक येत असल्यास शेवटच्या दोन शब्दांपूर्वी व वापरून स्वल्पविराम वापरण्यात येतो. तसेच एखाद्याला काही बोलायचे असल्यास संबोधन करायचे असल्यास स्वल्पविराम वापरण्यात येतो. इंग्रजीमध्ये या चिन्हाला कॉमा म्हणून संबोधले जाते
उदा.
1..मी आज वरण-भात भाजी पोळी व कडी जेवलो.
- मी माझ्यासोबत शॉर्ट पॅन्ट टी-शर्ट व बॅक घेऊ सहलीला गेले
3.रेखाने ऋतूला सांगितले की,” मला तुझी आई खूप आवडते.”
३ .अपूर्णविराम(:)
जेव्हा एखाद्या गोष्टीचे विवरण दिले जाते त्यापूर्वी अपूर्णविरामाचा वापर केला जातो अपूर्णविराम हे अक्षरांना जोडून येत नाही. इंग्रजीमध्ये या चिन्हाला कोलन म्हणतात.apurna viram chinh in marathi
उदा.
1.मला तीन रंग आवडतात : काळा, निळा आणि लाल
- मला तीन मित्र आहे : सुनील ,रवी व सीता
४ .अर्धविराम ( ; )
दोन वाक्य जोडताना उभयान्वयी अव्ययांचा वापर करतात परंतु याचा वापर न करता दोन वाक्य जोडण्यासाठी अर्धविराम वापरतात इंग्रजीमध्ये याला सेमी कॉलम असे म्हणतात. ardh viram chinh in marathi.
उदा.
1.त्यांनी खूप कष्ट उपसले ;पण तो स्पर्धा परीक्षेत पास झाला नाही.
2.त्याने खूप प्रयत्न केले; पण देवाने त्याला माफ केले नाही.
५ .उद्गारचिह्न (!)
मनुष्य हा भावनिक प्राणी आहे त्याला राग मच्छर प्रेम अशा भावना त्याच्या मनात निर्माण होत असतात या भावना लिखाणातून दाखवण्यासाठी उद्गारवाचक चिन्हांचा वापर केला जातो. ही विरामचिन्ह एकापेक्षा जास्त वेळा पण वापरण्यात येतात जेव्हा भावनांची तीव्रता ही जास्त असते तेव्हा एकापेक्षा जास्त वेळा उद्गारवाचक चिन्ह ( ( !!! )वापरू शकतो .इंग्रजीमध्ये या चिन्हाला एक्सप्लेमेंटरी मार्क असे म्हणतात.
उदा.
1.बापरे ! किती मोठे डोंगर आहे
2.अभिनंदन ( ! )आपण प्राप्त आपण प्राप्त केलेल्या यशाबद्दल
६ .प्रश्नचिह्न ( ? )
लिखाणात प्रश्न दर्शवण्यासाठी प्रश्नचिन्ह वापरतात. यालाच क्वालिफिकेशन मार्क असे इंग्रजीत म्हणतात.
उदा.
- कुठे गेली होती?
- इतका वेळ का झाला तुम्हाला ?
3.तुम्ही कधी येणार आहे.?
७ .एकेरी अवतरणचिन्ह (‘…’)
लिखाण करताना आपल्याला एखाद्या शब्दावर विशेष लक्ष देण्यासाठी एकेरी अवतरण चिन्हाचा वापर करतात हे चिन्ह स्वल्पविराम सारखी उलटी-सुल्टी दिसतात इंग्रजीत या चिन्हाला सिंगल इन्वर्टेड कॉमा असे म्हणतात.
1.त्या बॉलचा रंग ‘लाल’ होता.
- मी काल वेस्टर्न ‘प्रकारचा ड्रेस’ घातला.
८ .दुहेरी अवतरण चिन्ह (“…”)
लिखाण करताना आपल्याला कधी कधी कोणतेही शब्द एखाद्याच्या मूळ शब्दापासून दाखवायचे असल्यास दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर केला जातो. जसे मधु म्हणाला की की,” तो मनुष्य खूप महान आहे”. लिखाण करताना जेव्हा संवाद सुरू होतो तेव्हा पहिले दुहेरी अवतरण चिन्हचिन्ह आधी वापरतात व संवाद संपल्यावर दुसरे दुहेरी चिन्ह हे वापरतात .इंग्रजीत याला डबल इन्व्हर्टेड कॉमा असे म्हणतात
- राधा गोपीला सांगते की,” मला बागेत फिरायला जायचे होते”.
viram chinh in marathi chart
९ .संयोग चिन्ह (-)
दोन सारख्या परिमाणाची शब्द जोडताना संयोग चिन्हाचा वापर केला जातो. उदाहरणार्थ
मित्र -मैत्रीण, माता-पिता, पिता-पुत्र, आई-वडील
दोन पर्यायी अंक दाखवताना संयोग चिन्ह वापरतात
उदाहरणार्थ ,8-7 ,1650-60
वर्ष महा आणि दिवस दर्शवण्यासाठी सुद्धा या चिन्हाचा वापर केला जातो उदाहरणार्थ दिनांक.20-5-2023
१०.अपसारण चिन्ह (–)
या चिन्हाची लांबी संयोग चिन्ह पेक्षा थोडी जास्त असते. इंग्रजीमध्ये या चिन्हाला एम डॅश म्हणून ओळखले जाते .
प्रतीक्षा माझी बायको- आज माझा मुलगा श्यामला घेऊन येणार होती .
११ .संक्षिप्त रूप (०)
मराठी मध्ये एखाद्या शब्दाचे संक्षिप्त रूप दाखवण्यासाठी या (०) चिन्हाचा वापर करतात. उदाहरणार्थ डाॅ०
उदा०
१२.काकपदा सारखे एक चिन्ह( ^)
काकपदा सारखे एक चिन्ह विराम चिन्ह वापरले जाते जेव्हा लिखाण करताना आपल्या एखाद्या शब्द अनावधानाने विसरतो तेव्हा या चिन्हाचा वापर केला जातो ( ^)
१३ .लोपचिन्ह (…)
बोलताना पुटपुटणे मनातले विचार मनातच राहणे अर्धवट काढलेले तोडके मोडके विचार दाखवण्यासाठी लोक चिन्ह वापरतात .
तू मला भेटणार होता मग…
पण.. मोहिमेला जायचे कसे
१४ .अवग्रह(ऽ)
एखाद्या अक्षराचा उच्चार हा लांब आहे हे दर्शविण्यासाठी अवग्रह वापरतात उदाहरणार्थ
(1) शू ऽ! काय आहे तिकडे
(2) का ऽ का पुढे काय आहे तिकडे.
१५ .(तिरपा डॅश) (/)
जेव्हा समोर दोन पर्याय येतात तेव्हा लिखाण करताना तिरपा डॅश वापरला जातो
उदाहरणार्थ .कायद्यासमोर स्त्री/पुरुष समान आहेत.
‘एकेरी खंजीर’ नावाचे चिन्ह (†):-जेव्हा आपण एखादा परिच्छेद लिहितो त्यावेळी आपल्याला एखाद्या शब्दाचा अर्थ हा लिखाणाच्या शेवटी दर्शवायचा असतो त्यावेळी आपल्याला हे एकेरी खंजर चिन्ह वापरता येते..(‡)एकापेक्षा जास्त फुलाचे करायचे असल्यास हे दुहेरी खंजेरी चिन्ह वापरता येते.
डबल बार [Double bar(||) हे चिन्ह कविता आरती किंवा काव्यात्मक लेखन करताना खूपदा आढळते.