MARATHI LANGUAGE
Marathi Language /मराठी भाषा
महाराष्ट्रात जन्मलेल्या आणि महाराष्ट्रातच वाढलेल्या लोकांची मातृभाषा मराठीच असते. मराठी भाषा कधी निर्माण झाली आणि या भाषेचे जनक कोणाकडे द्यायचे ,असे कुतूहल मनामद्धे जागे होते.
तेव्हा मराठी भाषेचा /Marathi languageइतिहास अभ्यासावा लागतो. मराठी भाषेच्या निर्मितीचा शोध घेण्यासाठी अनेक अभ्यासकांनी केलेल्या संशोधनातून एक असा महत्वाचा निष्कर्ष निघतो की ,मराठी भाषेच्या निर्मितीक्रमाचा प्रवास ‘संस्कृत’ ‘प्राकृत’ महाराष्ट्री अपभ्रंश सध्याची मराठी भाषा असा आहे .
हा प्रवास एका वाक्यात सांगता आला तरी या प्रवासाचे अभ्यासपूर्ण संशोधन काही शतके झाले .त्यामध्ये उच्चारप्रक्रिय ,प्रत्ययप्रक्रिया आणि शब्दसंपती याबाबत संस्कृत आणि मराठी भाषेमध्ये सारखेपणा दिसून येतो ,परंतु संस्कृत व मराठी भाषेत थेट जन्य-जनक संबंध स्वीकारता येत नाही .
कारण मराठी भाषेमध्ये काळानुसार सतत बदल होत गेला आहे. तिचा अनेक देशी-विदेशी भाषांशी सबंध आला आहे.त्यामुळे तिचे एकाच एक रूप आपल्याला दाखवता येत नाही.संस्कृत आणि मराठी भाषा यामधील भेद .
मराठी भाषेमध्ये ‘ळ’ या ध्वनीचा समावेश केला गेला आहे,जो संस्कृत भाषेमध्ये नाही.मराठी विभक्तीचे प्रत्यय वापरले जतातच;पण त्याशिवाय शब्दयोगी अव्ययेही मोठ्या प्रमाणात वापरली जातात.सस्कृतमधील लिंग व्यवस्था मराठीपेक्षा वेगळी आहे.उदाहरणार्थ,’जन्म’हा शब्द संस्कृतमध्ये नपुसक लिंगी आहे आणि मराठी मध्ये पुल्लिंगी आहे.
व्याकरणातील ‘काळ’ या संकल्पनेचा विचार केला तर आढळते की,मराठी एकाच भूतकाळ आहे, ’अनध्यातण’ भूत आणि ‘परोक्ष भूत’अशी दोन बाकीची भूतकालीन रुपे,हे भूतकाळचे प्रकार आहेत. संस्कृत भाषेतील हे भूतकाळाचे प्रकार मराठी भाषेत Marathi language मध्ये नाहीत.
संस्कृत भाषेमध्ये ‘प्रथम भविष्य’ व द्वितीय भविष्य’ असे भविष्यकाळाचे प्रकार आहेत. मराठी भाषेमध्ये एकाच भविष्यकाळ आहे बाकीची भविष्यकालीन रुपे ही भविष्यकाळचे उपप्रकार आहेत.
मराठी भाषेत तत्सम शब्द आहेतच पण तद्भव शब्दाचाही फार मोठे स्थान आहेत. उच्चार दृष्ट्या विचार केला केला तर ऋषि ,ऐरण,.औत,या शब्दातील ऋ ,ऐ ,औ , हे स्वर तसेच ड. न्न,य,ष, ही व्यंजने संस्कृत वरुण घेतली आहेत.
संस्कृत प्रमाणेच मराठीमध्ये सुद्धा स्वरांचे र्हस्व ,दीर्घ ,लुप्त आणि निभृत असे उच्चार होतात नवीन भाषा तयार करताना मराठी भाषा संस्कृत भाषेचा आधार घेतो.
प्राचीन आर्य वंशातील प्रमुख भाषा असणार्या संस्कृत भाषेत वेद्काळापासून क्षेष्ठा प्रतीचे ग्रंथ निर्माण झाले.ज्ञान भाषा ही धर्मभाषा या अर्थाने संस्कृत भाषा संपन्न आहेच.
. त्याचप्रमाणे काव्य नाटक इत्यादि ललित वाड्मय मध्ये तिची श्रेष्ठता दिसून येते ,त्यामुळेच मराठी भाषा ही संस्कृत भाषेपौन निर्माण झाली आहे ,असा एक निसकर्ष समाजमनात ठसला आहे.
डॉ.ब्लो ,डॉ,ग,वा,तगारे, डॉ म. ए.करंदीकर ,डॉ ए गो कालेलकर यांनी मराठी भाषेची निर्मिती ‘महाराष्ट्री प्राकृत पासून झाली ,असे मत व्यक्त केले आहे ,मराठी भाषेवर महाराष्ट्री प्राकृत भाषेचाही परिणाम झाला आहे
उधाहरणार्थ.
- मराठी भाषेतील / Marathi language मध्ये ‘मी’ हे एकवचनी सर्वनाम ; तसेच ‘म्या’ हे बोलीभाषेतील तृतीयचे एकवचनी रूप ‘मिया’ या प्राकृत शब्दापासून सिद्ध झाले आहे.
- मराठीतील चतुर्थी व षष्ठी विभक्ती यांच्या प्राकृत भाषेतील ‘स ,स्स,या प्रत्यावरून ‘सी.स’ प्रत्यय आला आहे.
- करतात.ठेवतात,मानत, अश्या प्रकारची वैकल्पिक रुपे करण्याची पद्धत ही मराठीने प्राकृत भाषेवरुन घेतली आहे असे म्हणता येते.
- संस्कृत भाषेतील काही शब्दाच्या उच्चारचे सुलभीकरण हा महाराष्ट्री प्रकृतचा विशेष मराठीत उतरला आहे.
प्रत्येक भाषेत सततच ,पण दीर्घकालीन आंतरिक घडामोडी चालू असतात,मराठी भाषेतील सामान्य रूपाची सुरुवात महाराष्ट्री अपभ्रशाने प्रथम केली असे दिसते.
एका विशिष्ट अवस्थेला भाषेतून नवी भाषा जन्माला येण्याची प्रक्रिया चालू असते.यामध्ये भाषिक संक्रमन घडत असते आणि जुन्या भाषेचे अनेक विशेष आत्मसात करण्याचीही वृत्ती असते .
मग नवी भाषा प्रस्थापित होवून तिला स्वतंत्र नाव प्राप्त होते आणि समाजमण्यातही मिळते.अर्थातच ,त्याला धार्मिक ,राजकीय ,धाटणा करणीभूत होण्याची शक्यता असते ,तेव्हा ‘महाराष्ट्री अपभ्रंश’यापासूनंच मराठी भाषा जन्माला आली,या निर्णायप्रत आपण येवू शकतो .
मराठी भाषेमध्ये विभक्ती प्रत्यययुक्त शब्दखेरीज इतर शब्दयोगी अव्यये यांचा वापरही प्रारंभ महाराष्ट्री अपभ्रंश भाषेने केलेला दिसतो ,यावर शं .गो.तुळपुळे व ब. अ भिडे यांनी संशोधन केलेले दिसते.
मराठीतील ग्रंथसंपदा ,शिलालेख ,कोरीव लेख ,ताम्रपट , यांचे सखोल संशोधन केले असतं अभ्यासकांना आणि संशोधकांना मराठी भाषेचा जन्म ईसविसण नवव्या शतकात झाला असे आढळते आहे .
ग्रंथसंपदे संदर्भात विवेकसिंधु,ज्ञानेश्वरी,लिळाचरित्र,धवळे ,राजीमती,प्रबोध,अभिलशितरथ चिंतामणि इडयाडी ग्रंथाचा विचार केलेला दिसतो ,तर कोरीव लेखामद्धे डॉ .व.वी.मिराशी.डॉ मो.ग दीक्षित .डॉ.शं.गो.तुळपुळे या संषेधक अभ्यासकणे विशेष परिश्रम घेवून चूर शिलालेख 1285 पंढरपूरचा चौरांशीचा शिलालेख 1273 राणे वेलूर 1252 आंबेजोगाई आणि पाटण अश्रीचा शिलालेख 1012 हे शिलालेख अभ्यासून मराठी भाषेचा जन्म इसविसन नवव्या शतकात झाला असा निष्कर्ष काढता येतो ,असे म्हटले आहे.
सततच्या इस्लामी आक्रमणामुळे मराठी भाषेवर अरबी,फारसी,उर्दू,या भाषेचा परिणाम झाला .गझनी खिळजी,घोरी,मोघाल अश्या टोळ्यांपासून भारतावर आक्रमणे होत राहिली आणि या टोळ्या चौदाव्या शतकात महाराष्ट्रात आल्यानंतर सातरवया शतकात मराठे शाही आली .
याच काळात काही उयोपियन भाषेशी विशेषतः इंग्लिश भाषेशी संबंध येत राहिला,त्यानंतर सुमारे दिधशे वर्षाहून अधिक काळपर्यंतइंग्रजांनी भारतात राजवट निर्माण केली . त्याचा परिणाम म्हणून मराठीच्या वरनामध्ये ‘ हे स्वर स्वीकारले गेले.या सर्व परिनामांनी मराठी भाषा विकसित होत गेली.
विसाव्या शतकाच्या उत्तरधार्थ मराठी भाषेच्या शुध्दलेखनाकडे अनेक आब्यासाकांचे लक्ष वेधले गेले. त्यानंतर मराठी शुद्धलेखनाची नियमावली शासनातर्फे निश्चित करण्यात आली.अर्थातच त्यासाठी अनेकांचे योगदान आहे हे विसरून चालणार नाही .
येथपर्यंत मराठी भाषेच्या पूर्वपीठिकेचा आढावा घेवून विद्यमान मराठी भाषेचा विचार करता असे आढळले की ,आजवर मराठी भाषेवर अनेक देशी विदेशी भाषेचा पगडा आहे. एकविसाव्या शतकात सारे जगच मुळी तंत्राद्यान क्षेत्रातील व्याखेनुसार ‘जागतिक खेडे’बनलेले असल्याने संपूर्णपणे शुद्ध मराठी संभाषण करणार्या व लेखन करणार्या व्यक्ति दुर्मिळ आहे.
टेक्नॉलजी प्रगतीमुळे जग फार जवळ आल्याने आणि अनेक भाषांशी मराठी भाषेचा संबंध येत असल्याने मराठी भाषेचे स्वरूप ‘भेसळयुक्त’मराठी भाषा ‘ असे झाले आहे .व्याक्यरचना,शब्दयोजना आणि एकूणच मराठी भाषेचा व्यवहारात उपयोग करण्यामध्ये तसेच सामाजिक-संस्कृतिक शैक्षणिक वैज्ञानिक इत्यादि क्षेत्रामद्धे मराठी भाषेच्या योगदानामध्ये एकसारखी मराठी भाषा सांभाषांनामध्ये व लेखनमध्ये उपयोगात आणली जात आहे.
मराठी भाषेक्या व्याकरणाकडे मराठी भाषिकांचे होणारे दुर्लक्ष हे त्याचे प्रमुख कारण असू शकते.म्हणूनच मराठी भाषेला स्वतंत्र असतीत्व रखायचे असेल तर व्याकरणक्या नियमाप्रमाणेच सांभाषाण आणि लेखन झाले पाहिजे ,हा आपला प्रतेकाचा आग्रह असला पाहिजे .
मराठी भाषा दिन
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित झालेले मराठी साहित्यातील सुप्रसिद्ध मराठी लेखक वी .वा . शिरवाडकर उर्फ ‘कुसुमाग्रज’ यांच्या जन्मदिवस मराठी भाषाकांकडून ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा होतो. यांचे श्रेय जगातील मराठी अकादमीला जांनी पुढाकार घेतला त्याला जाते.
Marathi Grammar हे सुद्धा एक खूप आवडीचा आब्यासाचा विषय आहे .