Sarvnam in Marathi
नक्की वाचा :- नाम व नामाचे प्रकार
सर्वनाम म्हणजे नामा ऐवजी येणारा शब्द
- सर्वनामा करीता वापरल्या जाणार्या परंतु स्वतत्रं़ अस्तित्व नसलेला शब्द म्हणजे सर्वनाम
होय. - नामाऐवजी येणाÚया विकारी शब्दास सर्वनाम असे म्हणतात
- सर्वनामाला स्वतःच्या अर्थ नसतो, सर्वनाम ज्या नामा बद्दल आलेले असतात. त्या नामाचा
अर्थ त्याला प्रांप्त होतो
सर्वनाम= प्रतिनाम
एकूण मूळ सर्वनामे 9 आहेत.
एकूण मूळ सर्वनामे किती?
1)आठ 2)सहा 3)नऊ 4)दहा
मी- तू- तो- हा- जो-कोण- काय- आपण- स्वतः
लिंगानुसार बदलणारे सर्वनाम 3 आहेत
उदा.
तो, हा, जो
पु. | स्त्री | न.पु . |
तो | ती | ने |
हा | ही | हे |
जो | जी | जे |
वचनानुसार बदलणारी सर्वनामे पाच आहे
उदा.
मी, तू, तो, हा, जो.
एकवचन | अनेकवचन |
तो,ती,ते | त्या |
हा,ही,हे, | ह्या |
जो,जी,जे | ज्या |
मी | आम्ही |
तू | तुम्ही |
सर्वनाम
बांलणारा | 1ला | मी, आम्ही, आपण, स्वतः |
ज्याच्याशी बोलतो | 2रा | तू, तुम्ही |
ज्याच्या विषयी बोलतो | 3रा | तो ती, त, त्या |
वरील तिन्हीही सर्वनामाबद्दल ऐणाÚया सर्वनामांना पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतातसर्वनामाचे
एकून सहा प्रकार पडतातसर्वनामाचे
एकूण किती प्रकार पडतात?
1)एक 2)दोन 3)निन 4) सहा
1) पुरुषवाचक सर्वनाम
2)दर्शक सर्वनाम
3)संबधी सर्वनाम
4)प्रश्नार्थक सर्वनाम
5)अनिश्चित सर्वनाम
6)आत्मवाचक / स्वतःह वाचक सर्वनाम
1) पुरुषवाचक सर्वनाम
1) पुरुषवाचक सर्वनाम:-पुरुषवाचक सर्वनामाचे तीन प्रकार पडतातअ
अ)प्रथम पुरुषवाचक सर्वनाम
ब)द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम
क)तृतीय पुरुषवाचक सर्वनाम
अ)प्रथम पुरुषवाचक सर्वनाम:-
जे सर्वनाम स्वतःह विषयी वारतात त्यांना प्रथम पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात
उदा.
मी, आम्ही, आपण, स्वतःह,मी
- मी गावी जातो.
- स्वतःह चि़त्रपट पाहीला
- आम्ही स्पर्धा पाहतो.
- मी अभ्यास पूर्ण केला मी सर्कस पाहतो.
- आम्ही रांगोळी काढली
- आपण् क्रिकेट खेळू.
- आम्ही दिल्लीला फिरायला गेलो.
- मी क्रिकेट खेळतो
ब)द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम:-
त्याच्याशी बोलतो त्याविषयी वापरण्यात येणारे सर्वनाम होय.
उदा.
तू, तूम्ही
तू गावी जाणार का? | तू क्रिकेट खेळ |
तूम्ही परीक्षा दिली? | तूम्ही पैसे दिलेतू |
तूम्ही परीक्षा दिली? | तूम्ही पैसे दिलेतू |
तू अभ्यास कर | तू खरे बोल |
तूम्ही बाजारात जा. | तूम्ही पैसे काढले |
तू आनंदी राहा. | तू घरी परत ये. |
क)तृतीय पुरुषवाचक सर्वनाम
याच्या विषयी / ज्या बाबत बोलले जाते त्याकरीता वापरण्यात येणारे सर्वनाम
उदा.
तो, ती, ते, त्या
तोक्रिकेट खेळतो. | ती रांगोळी काढते |
ते प्राचीन मंदीर आहे. | तो सर्वाना मदत करतो |
ती सुरेल गाणे गाते. | ते घर बंद आहे. |
त्या मुलांचे नाव काय. | तो नेहमी खरा बोलतो. |
ती चिमणी उडून गेली. |
2 ) दर्शक सर्वनाम
जवळची किंवा दुरची वस्तू दाखविण्या करीता ज्या सर्वनामाचा उपयोग
होतो त्यास दर्शक सर्वनाम असे म्हणतात
उदा.
हा ही हे ह्या
( अंतर:- हा ही हे ह्या :- जवळ)
( अंतर:-तो ती ते त्या- दुर)
हा पक्षी बोलका आहे. | हे शेत हिरवेगार होते |
हा विद्यार्थी प्रामाणिक आहे | ह्या मुलींनी संदुर रागोळी काढली |
हे संदुर फुल आहे | ह्यांनी सर्वाना मदत केली. |
हा राजवाडा आहे | ही जुनी शाळा होती. |
ही गाडी नविन आहे. |
3)संबंधी सर्वनाम
वाक्यात पुढे येणाÚया दर्शक सर्वनामासाठी ज्या सर्वनामाचा उपयोग
होता त्यास सबंधी सर्वनाम म्हणतात
उदा.
जो जी, जे, ज्या
जो चढतो तो पडतो | जे चकाकते ते सारे सोने नसते |
जी वस्तू माझी होती ती चोरुन नेली | जो करेल तो भरेल |
ज्याने प्रतिज्ञा केले त्याने पूर्ण केले | जो सर्वाना आवडतो तो देवाला आवडतो. |
ज्याने भांडण केले त्याने माघार घेतली | जो अभ्यास करतो तो उत्तीर्ण होतो |
4)प्रश्नार्थक सर्वनाम:-
वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी वापरण्यात येणारे सर्वनाम म्हणजे
प्रश्नार्थक सर्वनाम होय.
उदा.
कोण , काय, कुणास, कुणाला, कोणी, किती, कुढे, कशा या सारख्या प्रश्नार्थक
उपयोग करतात
कोण | …………………? |
काय | …………………? |
किती | …………………? |
कोण आले ते सागां? | काय प्रश्न आहे तुझा? |
कोणाला पैसे दिले तू? | कोणी या प्रश्नाचे उत्तर दिले? |
किती धावा काढल्या सचिनने? | कुढे चाललास तू ? |
कशासाठी वस्तू खरेदी केल्या? | काय तो वाद झाला ? |
किती सांगू तूला ? | काय झाले त्याला ? |
5)आत्मवाचक / स्वतःह वाचक सर्वनाम
स्वतःहा बद्दल बोलायचे असल्यास / किंवा
हजर व्यक्तीबद्दल बोलायचे असल्यास आत्मवाचक सर्वनाम उपयोग करतात
उदा.
आपण – स्वतःह – निज
- आपण , स्वतःह हे दोन्ही सर्वनाम पुरुषवाचक सर्वनाम आहे
- आपण् हे सर्वनाम अनेकवचनी असून कधी कधी एकवचन व अनेकवचन अशा दोन्ही तरेने
वापरता येते - आपण् हे सर्वनाम आम्ही किंवा तूम्ही या अर्थाने वापरता येते
आपण् सहलीस जाऊ | स्वतः काम पुर्ण कर. |
स्वतः त्यांना पाहीले. | स्वतःला काय समजता. |
स्वतः मेहनत करावी | आपले काम आपणच करावे |
आपण होवूनच कामे होऊ लागली | स्वतः पुर्ण लक्ष्य दिले? |
आपण खो खो खेळू ? | आपण आपला प्रश्न सोडवावा? |
काही महत्वाचे मुद्दे
- सर्वनामे ही नामाच्या ऐवजी येत असल्यामुळे नामांना जे प्रत्यय लागतात तेच प्रत्यय बहूदा
सर्वनामान लागतात
उदा.
नाम + प्रत्यय | =सर्वनाम +प्रत्यय |
राम+ने | =त्या+ने |
घर +चे | =त्या +चे |
- सर्वनामाचे लिंग व वचन ते ज्या नामाबद्दल आले आहे त्यावर अवलंबून असते
नाम | सर्वनाम | ||
लिंग | पू. | राम/मुलगा | तो |
स्त्री | सिता/मुलगी | ती | |
न.पु | मुले | ते | |
वचन | एक | नदी | ती |
अनेक | नद्या | त्या |
नक्की वाचा :- विशेषण व त्याचे प्रकार