Skip to content

मराठी व्याकरण || Marathi Vyakaran

Home » मराठी व्याकरण परिचय » vakyache prakar in marathi || वाक्य व त्याचे प्रकार

vakyache prakar in marathi || वाक्य व त्याचे प्रकार

vakyache prakar in marathi

vakyache prakar in marathi

आपण जे बोलतो ती वाक्य अर्थपूर्ण असतात. प्रत्येक वाक्य अर्थपूर्ण असतात किंवा प्रत्येक वाक्य संपूर्ण विधान असते. त्या वाक्याचे वेगवेगळे संदर्भात वेगवेगळे प्रकार पडतात .

मराठी वाक्य प्रकार खालील आहे. Types of sentences in marathi

* खरा अर्थाने वाक्याचे दोन प्रकार पडतात. वाक्यांचे दोन वर्गीकरण कोणते?

  1. अर्थावरून
  2. रचनेवरुन

 *अर्थावरून पडणारे प्रकार सहा आहेत. वाक्याचे किती /कोणते प्रकार आहेत? उत्तर -९

  1. विधानार्थी वाक्य
  2. होकारार्थी वाक्य
  3. नकारार्थी वाक्य
  4. प्रश्नार्थी वाक्य
  5. उद्गारार्थी वाक्य
  6. आज्ञार्थी वाक्य

*रचनेवरून पडणारे वाक्य

  1. केवल वाक्य ,
  2. संयुक्त वाक्य,
  3. मिश्र वाक्य,

अर्थावरून पडणारे वाक्य

१ . विधानार्थी वाक्य || vidhanarthi vakya in marathi

ज्या वाक्यात केवळ साधे विधान केले असेल त्यास विधानार्थी वाक्य असे म्हणतात.

विधानार्थी वाक्यात होकारार्थी ,नकारार्थी ,उद्गारार्थी, प्रश्नार्थी वाक्याचा समावेश होतो.

 विधानार्थी वाक्याचे दोन प्रकार पडतात.vidhanarthi vakya

वाक्यातील विधानावरून वाक्याचे किती प्रकार होतात? उत्तर-२  

  1. होकारार्थी
  2. नकारार्थी

विधानार्थी वाक्य ………..१) होकारार्थी वाक्य

                                         २) नकारार्थी वाक्य

———————-.पूर्णविराम

———————–होकारार्थी वाक्य                 विधानार्थी

———————– नकारार्थी वाक्य

विधानार्थी वाक्य 10 उदाहरण मराठी  vidhanarthi vakya 10 examples in marathi 

  1. रमेश शेतात काम करतो
  2. मनीष लोकांचे ऐकत नाही
  3. आज पाऊस पडला
  4. रवि वर्गात हजर नाही
  5. विद्यार्थी वर्गात अभ्यास करतात
  6. हा पक्षी आकाशात उडत असतो
  7. आजही नातवाला गोष्ट सांगते
  8. मी परीक्षा दिलेली नाही
  9. तो सतत खेळत असतो
  10. आज झाडावर पक्षी बसला नाही

१) विधानार्थी वाक्य   2 ) होकारार्थी वाक्य

२. होकारार्थी वाक्य

ज्या वाक्यात क्रियापद क्रियेचा होकार दर्शवितो. त्यास होकारार्थी वाक्य असे म्हणतात.

  1.  विद्यार्थी देवाची प्रार्थना करतात.
  2. राधा रांगोळी काढते.
  3. मी वृत्तपत्र वाचले .
  4. हा गाणारा पक्षी आहे.
  5. आज गावात जत्रा आहे.
  6. लोकांनी वृक्षारोपण करावे.
  7. महाराष्ट्र पूर्वगामी राज्य आहे.
  8. यंदा दुष्काळ आहे.
  9. नाऱ्याने बैलाची शर्यत जिंकली .
  10. शेतकरी शेतात राबतो .

१)विधानार्थी वाक्य

२)होकारार्थी वाक्य

३) नकारार्थी वाक्य

३.नकारार्थी वाक्य

ज्या वाक्यात क्रियापद क्रियेचा नकार दर्शवितो. त्यास नकारार्थी वाक्य असे म्हणतात.

  1. आज विद्यार्थी वर्गात उपस्थित नाही .
  2. परवानगीशिवाय आत येऊ नये.
  3. लहान मुलांनी खोटे बोलू नये.
  4. तो मी नव्हे .
  5. असे वागणे बरे नाही.
  6. हा ग्रह नाही .
  7. धूम्रपान करू नये. आज बातमी छापली नाही .
  8. यावर्षी जास्त पाऊस पडला नाही.
  9. परवानगीशिवाय आत जाऊ नये.

 १)विधानार्थी वाक्य

२)होकारार्थी वाक्य

३)नकारार्थी वाक्य

 

४ .  प्रश्नार्थी वाक्य ||prashnarthak vakya in marathi

ज्या वाक्यत प्रश्न विचारलेला असतो, त्या वाक्यास प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात .

प्रश्नार्थी वाक्यात प्रश्नार्थक सर्वनाम उदाहरणार्थ कोण ,काय ,किती ,कशा ,यासारख्या सर्वनामाचा उपयोग करून प्रश्नार्थक चिन्ह दिले जाते.

—————————–?

 उदाहरणार्थ

  1. वर्गातील विद्यार्थी अभ्यास का करीत नाही ?
  2. ही वस्तू घरी नेशील का ?
  3. आमचा निकाल चांगला लागला काय ?
  4. सचिनने किती धावा काढल्या?
  5. तो मला मजुरी देईल का?
  6. कोण आले ते सांग?
  7. किती वाजले ?
  8. काय आज शाळेला सुट्टी होती?
  9. त्याने कोणास बोलवले?
  10. काय समस्या आहे?

१)विधानार्थी वाक्य        १) प्रश्नार्थी वाक्य

२) होकारार्थी वाक्य

५ .उद्गारार्थी वाक्य

ज्या वाक्यात भावनेचा उद्गार काढलेला असतो त्यास उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात.

 उद्गारार्थी वाक्याच्या शेवटी उद्गार चिन्ह आले असते किंवा वाक्याच्या सुरुवातीस उद्गार आलेले असते म्हणजेच केवलप्रयोगी अव्यय असणारे.

 उद्गारार्थी वाक्य.

  1.  अरेरे !फार नुकसान झाले.
  2.  काय! तो पास झाला.
  3.  मी पक्षी असतो तर !
  4. मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री असतो तर!
  5.  मला लॉटरी लागली तर!
  6.  मानवाला पंख असते तर!
  7.  अरेरे !भूकंप झाला वाटते .
  8. शाब्बास! चांगला खेडला.
  9.  मी सैनिक असतो तर!
  10.  सूर्य नसता तर !

१)उद्गारार्थी वाक्य

२) विधानार्थी वाक्य

३)प्रश्नांची वाक्य

६  .आज्ञार्थी वाक्य

ज्या वाक्यात आज्ञेचा बोध होतो त्यास आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात .

आज्ञार्थी वाक्य 10 उदाहरण मराठी

  1. शेतकऱ्यांनो आत्महत्या करू नका .
  2. मुलांनो शांत बसा.
  3. नागरिकांना भूदान करा.
  4. सैनिकांनो रक्षण करा.
  5. ते दार लावून टाक.
  6. राम इकडे ये.
  7. पाखरांनो घरट्यात परत जा.
  8. मित्रांनो स्वच्छता राखा .
  9. सैनिकांनो नागरिकास संरक्षण करा.
  10. शेतकऱ्यांना शेतीचा विकास करा.

 

  • आज्ञार्थी वाक्य २)विधानार्थी वाक्य ३)प्रश्नार्थी वाक्य

 

रचनेवरून वाक्याचे प्रकार

  1. केवल वाक्य/साधे वाक्य (सिम्पल सेन्टेन्स)
  2. संयुक्त वाक्य (कंपाउंड सेन्टेन्स)
  3. मिश्र वाक्य (कॉम्प्लेक्स)

kinds of sentences in marathi

१ .केवल वाक्य

केवल  वाक्य म्हणजे काय?

ज्या वाक्यात केवळ एकच उद्देश व एकच विधेय असेल तर त्यास केवल वाक्य असे म्हणतात.

 उद्देश— करता

 विधेयक— क्रियापद

 एकच उद्देश एकच विधेयक =केवल वाक्य

(——————————.पूर्णविराम)

    • आम्ही जातो आमच्या गावा .
    • तानाजी लढता लढता मेला.
    • गीता रहस्य चे लेखक टिळक आहे .
    • मी फरशीवरून चालत असताना पाय घसरून खाली पडलो.
    • पुष्कळ वर्षांपूर्वी मोठ्या उत्साहाने घराच्या अंगणात केळीचे रोप लावले.
    • माझ्या आईने मला चिवडा लाडू चा डब्बा दिला.
    • आकाशात पश्चिमेकडे चमकणारा शुक्रतारा दिसतो.
    • वडिलांनी मला नातेवाईकाची ओळख करून दिली.
    • मी सेवानिवृत्त झाल्यावर आत्मवृत्त लिहिणार.
    • चहापाणी करणे मला आवडत नाही.
    • केवल वाक्य २) मिश्र वाक्य

२  .संयुक्त वाक्य

संयुक्त वाक्य म्हणजे काय?

संयुक्त वाक्य दोन किंवा अधिक केवल वाक्य प्रधानात व बोधक उभयान्वयी अव्यय नी जोडली असतात.

 जे वाक्य तयार होते त्यास प्रधानत्व बोधक संयुक्त वाक्य असे म्हणतात.

 संयुक्त वाक्यात आणि, व ,अथवा, किंवा, शिवाय, अन, पण, यासारख्या प्रधानात्व सुचक उभयान्वयी अव्ययाचा उपयोग करतात .

प्रधान वाक्य/ मुख्य वाक्य +  प्रधान वाक्य/ मुख्य वाक्य

= संयुक्त वाक्य

  केवल वाक्य + केवल वाक्य = संयुक्त वाक्य                                                                                                                प्रधानत्वअव्यय

  • पक्षी आकाशात विरत असतात परंतु त्यांचे लक्ष पिल्लांकडे असते.
  • विद्यार्थी खूप अभ्यास करतात आणि खेळण्यात प्रथम असतात.
  • विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली.
  • लोक स्मृती करो निंदा.
  • मरावे परी कर्तव्यरुपी उरावे.
  • रस्त्यात गाडी बंद पडली म्हणून उशीर झाला.
  • पहाट झाली पक्षी किलबिलाट करू लागले.
  • तो गावी जाणार पण परत केव्हा येणार.
  • तुला पैसा हवा की धन हवे.
  • मी शाळेत पोहोचलो आणि घंटा वाजली .

 

१)केवल वाक्य

२)मिश्र वाक्य

३)संयुक्त वाक्य

३ .मिश्र वाक्य (कॉम्प्लेक्स सेन्टेन्स)

                                             एक प्रधानवाक्य / एक गौन वाक्य (उपवाक्य) गौणत्व सुचक उभयान्वयी अव्ययाने जोडले असता जे वाक्य तयार होते त्यास मिश्र वाक्य असे म्हणतात.

 प्रधान वाक्य/मुख्य वाक्य + उपवाक्य

 

जर ———–तर                    संकेत दर्शक संकेत अर्थ

जरी———–तरी

जेथे———–तेथे                    मिश्र वाक्य (क्रियाविशेषण अव्यय)

 जेवी———-तेवी

जेव्हा———-तेव्हा

जिकडे———तिकडे

जो————तो                       संबंधी सर्वनाम

 ते———— जे

ज्या———– त्या

संकेत दर्शक उभयान्वयी अव्यय क्रियाविशेषण अव्यय संबंधित सर्वनाम असलेली वाक्य मिश्र वाक्यात आलेले असतात.

  • मुख्यमंत्री म्हणाले की दहशतवादावर एकजूट असावे.
  • मी मनापासून अभ्यास केला म्हणून मला यश मिळाले.
  • त्याला पुरस्कार मिळाला कारण त्यांनी चांगली कामगिरी केली.
  • जर प्रयत्न केला तर यशस्वी होशील.
  • जरी त्याच्या पायात लागले तरी त्यांनी शर्यत पूर्ण केली.
  • जेव्हा घरी पोहोचलो तेव्हा नळाचे पाणी गेले होते.
  • जेथे जातो तेथे तू माझ्या सोबती असतो.
  • जिकडे पहावे तिकडे हिरवळच पसरलेली होती.
  • जेवी करावे तेवी प्राप्त होते.
  • जे चकाकते ते सारे सोने नसते.
  • जो चढतो तोच पडतो .
  • त्याने भांडण केली त्यांनीच माघार घेतली.
  • जी वस्तू माझी होती ती सर्वांना आवडली.
  • शरीर सुदृढ व्हावे म्हणून व्यायाम करतो.
  • संघ विजयी व्हावा यास्तव म्हणून प्रभू प्रयत्न केला.

 

  • केवल वाक्य
  • मिश्र वाक्य
  • संयुक्त वाक्य

आणखी वाचा :-सामान्य रूप 

error: Content is protected !!
0 Shares
Share via
Copy link
Powered by Social Snap