
नाम
नाम :–
नाम म्हणजे नाव
कोणत्याही खऱ्या किंवा काल्पनिक वस्तूला दिलेले नाव म्हणजे नाम
वाक्यात येणाऱ्या शब्दा साठी जे शब्द प्रत्यकक्षात असलेल्या किंवा काल्पनिक वस्तू त्यांचे गुणधर्म सांगणाऱ्यास नाम असे म्हणतात .
नामाचे तीन प्रकार पडतात
१)सामान्यनाम :- समानता ,संपूर्ण ,जाती
२)विशेषनाम :-स्वतः
३)भाववाचक नाम :- गुणधर्म धर्म निसर्गदत्त देणगी
सामान्यनाम
१) सामान्यनाम :-
एकाच जातीचा पदार्थातील समान गुणधर्म मुळे जे सर्वसामान्य नाव दिले जाते त्याला सामान्यनाम असे म्हणतात .
उ .दा .झाड ,मुलगा,मुलगी,घर,शाळा,नदी,डोंगर,वकील,शिक्षक,स्त्री
सामान्यानामाचे दोन प्रकार पडतात
१)समुदायवाचक नाम
२) पदार्थवाचक नाम .
१) समुदायवाचक नाम :-
समुहास दिलेले नाव म्हणजे समुदायवाचक नाम
उ .दा सैन्य ,वर्ग,समिती,कळप,थवा ,काफिला ,जमाव ,गुच्च्छा
२) पदार्थवाचक नाम :-
काही नाम हे संख्येशिवाय इतर परिणाम यांनी दाखवलेली असते त्यास पदार्थवाचक नाम असे म्हणतात.
उ.द.साखर, तेल,तांदूळ ,दुध ,पाणी,कापड,सोने
विशेषनाम
एकाच जातीच्या विशिष्ठ व्यक्तीचा किंवा प्राण्याचा किंवा वस्तूचा बोध करून दिलेल्या नामास विशेष नाम म्हणतात .