Marathi Mhani || with Meaning ||

Marathi Mhani

Reviewed by:
Rating:
5
On April 30, 2018
Last modified:May 15, 2018

Summary:

Best Marathi Mhani Asked In M.P.S.C. Exam

Marathi Mhani

Marathi Mhani

Marathi Mhani Or मराठी म्हणी हा महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षेत विचारल्या जाणारा अतिशय महत्त्वाचा घटक आहे

Mhani चा अभ्यास Marathi Grammar मध्ये करतांना आपण मराठी म्हणीचे वर्गीकरण करूया !

जसे Marathi mhani comedy ,marathi mhani on fish,marathi mhani on food,etc .

मराठी म्हणीचा अर्थ व junya marathi mhani with meaning समजून घेण्याचा प्रयत्न करूया !

म्हणीचा अभ्यास करतांना आपण काही मराठी ukhane अभ्यासू या !

आपल्या english बांधवांसाठी प्रत्येक marathi mhani in english सादर केले आहे !

Marathi idioms and their Meanings किंवा मराठी म्हणी व त्यांचे अर्थ ह्या पोस्ट मध्ये आपण वेळोवेळी नवीन नवीन mhani update करत राहू .

मराठी ग्राम्मर या संकेत स्थळाला subscribe  करूया म्हणजे आपणास updated mhani वाचावयास मिळतील .

Marathi Mhani
Marathi Mhani

Classification Of Marathi Mhani With Their English Translation

1.Marathi Mhani comedy

* आपण  हसे लोकांना शेंबूड आपल्याच नाकाला – ज्या दोषाबद्दल आपण दुसऱ्याला हसतो तो दोष आपल्या अंगी असणे

Āpaṇa hasē lōkānnā śēmbūḍa āpalyāca nākālā – jyā dōṣābaddala āpaṇa dusaṟyālā hasatō tō dōṣa āpalyā aṅgī asaṇē

 

* अडली गाय फटके खाय –एखादा माणूस अडचणीत सापडला ,कि त्याला हैराण केले जाते

Aḍalī gāya phaṭakē khāya –ēkhādā māṇūsa aḍacaṇīta sāpaḍalā,ki tyālā hairāṇa kēlē jātē

 

*आपला तो बाब्या दुसऱ्याचे ते कार्टे –स्वःताच्या बाबतीत असणारे चांगले विचार दुसऱ्याच्या बाबतीत ण ठेवण्याची वृत्ती असणे

Āpalā tō bābyā dusaṟyācē tē kārṭē –svaḥtācyā bābatīta asaṇārē cāṅgalē vicāra dusaṟyācyā bābatīta ṇa ṭhēvaṇyācī vr̥ttī asaṇē

 

*आत्याबाईला जर मिशा असत्या तर –नेहमी एखाद्या कामात जर तर या शक्यतांचा विचार करणे

Ātyābā’īlā jara miśā asatyā tara –nēhamī ēkhādyā kāmāta jara tara yā śakyatān̄cā vicāra karaṇē

 

*आपण मेल्या वाचून स्वर्ग दिसत नाही –अनुभवाशिवाय शहाणपण येत नाही

Āpaṇa mēlyā vācūna svarga disata nāhī –anubhavāśivāya śahāṇapaṇa yēta nāhī

 

*आपले नाक कापून दुसऱ्यास अपशकून –दुसऱ्याचे नुकसान करण्यासाठी प्रथम स्वताचे नुकसान करून घेणे

Āpalē nāka kāpūna dusaṟyāsa apaśakūna –dusaṟyācē nukasāna karaṇyāsāṭhī prathama svatācē nukasāna karūna ghēṇē

 

*आग रामेश्वरी ,बंब सोमेश्वरी- रोग एकीकडे,उपाय भलतीकडे

Āga rāmēśvarī,bamba sōmēśvarī- rōga ēkīkaḍē,upāya bhalatīkaḍē

 

*अंगठा सुजाला तर तो डोंगरा एवढा होईल का ?- कोणत्याही गोष्टीचा ठराविक मर्यादा असते

Aṅgaṭhā sujālā tara tō ḍōṅgarā ēvaḍhā hō’īla kā?- Kōṇatyāhī gōṣṭīcā ṭharāvika maryādā asatē

 

*अवाशी खाई तूप आणि सकाळी पाही रूप –अतिशय उतवालेपानाची कृती करणे

Avāśī khā’ī tūpa āṇi sakāḷī pāhī rūpa –atiśaya utavālēpānācī kr̥tī karaṇē

 

*आग खाईल तो कोळसा ओकेल –जशी कारणी तसे फळ

Āga khā’īla tō kōḷasā ōkēla –jaśī kāraṇī tasē phaḷa

 

*ओझे उचल तर म्हणे बाजीराव कुठे –सांगितलेले काम सोडून नसत्या चौकश्या करणे

Ōjhē ucala tara mhaṇē bājīrāva kuṭhē –sāṅgitalēlē kāma sōḍūna nasatyā caukaśyā karaṇē

 

*अधानातले रडतात तर सुपातले हसतात –संकटात असतांना दुसऱ्याचे दुखः पाहून हसू येते

Adhānātalē raḍatāta tara supātalē hasatāta –saṅkaṭāta asatānnā dusaṟyācē dukhaḥ pāhūna hasū yētē

 

*अति खाणे मसणात जाने –अति खाणे नुकसान कारक असते

Ati khāṇē masaṇāta jānē –ati khāṇē nukasāna kāraka asatē

 

*अठरा नखी खेटरे राखी ,वीस नखी घर राखी –मांजर घराचे तर कुत्रे दाराचे रक्षण करते

Aṭharā nakhī khēṭarē rākhī,vīsa nakhī ghara rākhī –mān̄jara gharācē tara kutrē dārācē rakṣaṇa karatē

 

*अवसाबाई इकडे पुनव बी तिकडे- एकमेकींच्या अगदी विरुद्ध बाजू

Avasābā’ī ikaḍē punava bī tikaḍē- ēkamēkīn̄cyā agadī virud’dha bājū

*********************************************************************************************************************

Marathi Mhani -2

 • असतील शिते तर जमतील भूते :- एखाद्या माणसाकडून फायदा होणार असला की त्याच्याभोवती  माणसे गोळा होतात .
 • असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ :- दुर्जन माणसाची संगत केल्यास प्रसंगी जीवालाही धोका निर्माण होतो.
 • अडला हरी गाढवाचे पाय धरी:- एखाद्या बुद्धिमान माणसालादेखील अडचणीच्या वेळी मूर्ख दुर्जनांची विनवणी करावी लागते .
 • अती शहाणा त्याचा बैल रिकामा;- जो मनुष्य हा शहाणपणा करायला जातो  त्याचे मुळीच काम होत नाही.
 • अति तिथे माती:- कोणत्याही गोष्टीचा अतिरेक शेवटी नुकसानकारक  पडतो.
 • अन्नछत्री जेवणे वर मिरपूड मागणे:- दुसऱ्याकडून आवश्यक ती धर्मार्थ मदत घ्यायची त्याशिवाय आणखीही काही गोष्टी मागून मिजास दाखवणे.
 • आधी पोटोबा मग विठोबा;- प्रथम पोटाची सोय पाहणीनंतर देव-धर्म करणे.
 • आपलेच दात आपलेच ओठ:- आपल्या माणसाने   चूक केल्यास अडचणीची परिस्थिती निर्माण होते.
 • आयत्या बिळावर नागोबा:- एखाद्याने स्वतःकरिता केलेल्या गोष्टीचा  आयता फायदा घेण्याची वृत्ती असणे.
 • आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे:- अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होणे
 • आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास:- मुळातच   आळशी असणाऱ्या माणसाच्या बाबतीत यांच्या harsh वृत्तीला पोषक अवस्था निर्माण होणे.
 • आंधळं दळतं  कुत्रं पीठ खातंय:- एकाने काम करावे दुसऱ्याने त्याचा फायदा घ्यावा .
 • आंधळ्या बहिऱ्याची गाठ :-एकमेकांना मदत करण्यास असमर्थ असणाऱ्या दोन माणसांची गाठ पडणे.
 • अगं  अग म्हशी मला कुठे नेशी :-  चूक स्वतः करून ती मान्य करायची नाही उलट ती चूक दुसऱ्याच्या माथी मारून मोकळे व्हायचे.
 • अडली गाय फटके खाय :- एखादा माणूस अडचणीत सापडला की त्याला हैराण केले जाते.
 • आपला हात जगन्नाथ:- आपली उन्नती आपल्या कर्तुत्वावर अवलंबून असते.
 • अर्ती  दान महापुण्य:-गरजू माणसाला दान दिल्याने पुण्य मिळते.
 • असेल त्यादिवशी दिवाळी नसेल त्या दिवशी शिमगा:- अनुकूलता असेल तेव्हा चैन करणे आणि नसेल तेव्हा उपवास करण्याची पाळी येणे.
 • आपली पाठ आपल्याला दिसत नाही:- स्वतःचे दोष स्वतःला दिसत नाही.
 • आजा मेला नातू झाला:- एखादे नुकसान झाले असता त्याचवेळी फायद्याची गोष्ट  घडणे.
 • आपल्या पोळीवर तूप ओढून घेणे:फक्त स्वतःच्या फायद्यासाठी झगडणे .
 • आलिया भोगासी असावे सादर:- तक्रार न करता निर्माण झालेली परिस्थिती स्वीकारणे
 • आवळा देऊन कोहळा काढणे:- आपला स्वार्थ साधण्यासाठी एखाद्या व्यक्तीला लहान वस्तू देऊन मोठी वस्तू मिळवणे.
 • आपण मेल्यावाचून स्वर्ग दिसत नाही:- अनुभवाशिवाय शहाणपण येत नाही.
 • आपले नाक कापून दुसऱ्याला अपशकुन:- दुसऱ्याचे नुकसान करण्यासाठी प्रथम स्वतःचे नुकसान करून घेणे.
 • आधीच  तारे त्यात  गेले वारे:-विचित्र व्यक्तीच्या वर्तनात भर  पडणारी घटना घडणे.
 • आधीच मर्कट तशात मद्य प्याला:- अजित करामती व त्यात मद्य प्राशन केल्याने अधिक विचित्र परिस्थिती निर्माण होणे.
 • आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी:- मुख्य गोष्टीपेक्षा अनुषंगिक गोष्टी चा  खर्च जास्त असणे .

Download  Mhani With Meaning Free Click To Download

Marathi Mhani Pdf Download

Powerpoint Presentation On Youtube video Click to Download

Best Marathi Mhani Asked In M.P.S.C. Exam
Stay With Us

I am Marathi Grammar Tutor giving free lessons on Grammar In Marathi

Leave a Reply

Social

Stay With Us
Copyright © 2018 Marathi Grammar || Marathi Vyakaran
%d bloggers like this: