Marathi Grammar

Marathi Grammar

Marathi Grammar

Marathi  Grammar किंवा मराठी व्याकरण हा महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा करिता महत्वाचा विषय आहे .

Introduction

कोणत्याही भर्ती परीक्षेमध्ये मराठी व्याकरण हा मोलाचा वाटा ठेवतो.

मराठी व्याकरण या संकेत स्थळामध्ये आपण मराठी व्याकरण वरील संपूर्ण अभासक्रम प्रकाशित करण्याचा व समजून  घेण्याचा प्रयत्न करू !

ह्या पोस्ट मध्ये आपण मराठी ग्राम्मर ह्या विषयाच्या अभ्यास क्रमाशी थोड समरस होवू .

ह्या संकेत स्थळावर लिहिण्याची पद्धत हि मराठी व इंग्रजी असेल .

ह्या संकेत स्थळावर आपण Marathi grammar pdf स्वरुपात Available  करून देण्याचा प्रयत्न करू !

 Grammar App on Marathi हा गुगल Android app प्ले स्टोर वरून मोफत Download  करू शकता .

व्याकरणावरील महत्वाचे प्रश्न आपण वेळो वेळी pdf स्वरुपात प्रकाशित करून डाऊनलोड करण्यास उपलब्ध करून देवू

व्याकरणावरील विडीओ आपणास यु टूब channel वर उपलब्ध करण्यात आले आहे व त्यात जास्तीत जास्त  विडीओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करूया !

स्पर्धा परीक्षेकरिता आवश्यक online सराव परीक्षा घेण्याचा व नवीन नवीन प्रश्नांसह सराव परीक्षेचा अभ्यास करू !

मराठी भाषा व मराठी भाषा दिन या दिनाविषयी माहिती जाणून घेवू !

मराठी व्याकरणाचा अभ्यासक्रम जाणून घेण्यासाठी आपणास काही पुस्तक काची माहिती असणे आवश्यक आहे .आवशक Marathi grammar Books हे सुद्धा साकेत स्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

MPSC परीक्षेच्या दृष्टीकोनातून मराठी व्याकरणाचा अभ्यास परिपूर्ण पणे यशस्वी रित्या पूर्ण करूया

माझ्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक मित्रांनो चला तर मग आपण मराठी व्याकरण या विषयाचा अभ्यासक्रम जाणून घेवू या !

Marathi Grammar अनुक्रमणिका

 • ग्रंथ व ग्रंथकार/Granth-Granthkar:-

ह्या मराठी व्याकरण topic मध्ये आपण परीक्षेत विचारल्या जाणाऱ्या लेखकाचे व त्याच्या लेखन प्रकाशित पुस्थाकाची माहिती मिळवू .स्पर्धा परीक्षामध्ये साहित्यिक व त्यांचे टोपण नाव पुष्कळ वेळा परीक्षेत विचारल्या जातात .त्यामुळे साहित्यिक व त्यांच्या  प्रकाशित पुस्तकाची माहिती आपण मिळवू या .आम्ही तुम्हाला pdf स्वरुपात या विषयाची माहिती देवू .

उदा .प्रह्लाद केशव अत्रे ह्यांचे टोपण नाव – केशव कुमार 

 

 

1) मराठी भाषा लिपी आणि व्याकरण/Marathi Bhasha -Lipi-Vyakaran:-

                                                     हा प्रकारामध्ये आपण मराठी भाषेचा उगम त्याची रचना ह्या बद्दल माहिती मिळवू .

 • मराठी भाषा 
 • मराठी लीपी 
 • मराठी व्याकरण 

marathi grammar video

                                

२) वर्ण विचार व प्रकार/Varnvichar in  marathi:-

 •  स्वरांचे प्रकार 

 • वर्ण प्रकार वर्णमाला 

marathi grammar video

 

३) स्वराधी/swardhi:-

ज्या वर्णाचा उच्चार करतांना स्वराची आधी मदत घ्यावी लागते त्यास स्वरांधी म्हणतात .

 • अनुस्वार 
 • विसर्ग 

 

४) व्यंजन/vyanjan:-

                                       ज्या वर्णाचा उच्चार करण्यास स्वराची आवशक्यता असते त्यास व्यंजन असे म्हणतात .

व्यंजनाचे खालील प्रकार पडतात

 1. स्पर्श व्यंजन

 2. अनुनासिक व्यंजन 

 3. अंतस्थ व्यंजन 

 4. उष्मे व्यंजन 

 5. महाप्राण व्यंजन 

 6. स्वतंत्र व्यंजन 

 7. संयुक्त व्यंजन 

 8. कठोर व्यंजन 

 9. मृदू व्यंजन 

 10. व्दित्त्त व्यंजन 

 11. र जोडाक्षर व्यंजन 

 12. कंठ व्यंजन 

 13. तालव्य व्यंजन 

 14. मृधन्या व्यंजन 

 15. औष्ठ्य व्यंजन 

 16. दंत तालव्य व्यंजन 

 17. कंठौष्ट्या व्यंजन 

 18. दंतौष्ट्या व्यंजन 

 

 

 • संधी/Marathi grammar sandhi:-

                                       संधी म्हणजे वर्णाचे एकत्रीकरण होय.

संधीचे खालील प्रकार पडतात 

स्वरसंधी 

व्यंजन संधी 

विसर्ग संधी

मराठी विशेष संधी:-

 

 • शब्दाच्या जाती/shabdanchya jati in marathi :-

शब्दाच्या  एकूण आठ जाती आहेत .

We Disscuss About definition of noun in marathi

 1. नाम /marathi grammar noun/Types of noun in marathi with examples:-
 2. सर्वनाम /marathi grammar sarvanam
 3. विशेषण /marathi grammar visheshan
 4. क्रियापद/marathi grammar kriyapad

Marathi Grammar avyay :_

 1. क्रिया विशेषण अव्यय /kriyavisheshan
 2. शब्दयोगी अव्यय /shadyogi avyay
 3. उभयान्वयी अव्यय /ubhanvyoyi avyay
 4. केवलप्रयोगी अव्यय/kevalprayogi avyay

 

 

 • विभक्ती/marathi grammar vibhakti :-

                                                -विभक्ती म्हणजे विभागीकरण /विभाग

-नाम व सर्वनाम त्याचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दाशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखविलेले असतात त्यांना विभक्ती असे म्हणतात 

Later In This Post We Disscuss vibhakti pratyay chart And Also We Provide You marathi grammar vibhakti video

 

-विभक्ती दर्शविणाऱ्या अक्षरांना विभक्ती प्रत्यय असे म्हणतात .

 

 • सामान्यरूप/samanya rup in marathi:-

                                                                    वाक्यातील शब्द,विशेषण,नाम,सर्वनाम  हि जशीच्या तशी मूळ स्वरुपात येत नाही वाक्यात त्याचा उपयोग करतांना त्याच्या रुपात कधी कधी बदल करावा लागतो .

-नामाच्या किंवा सर्व्नामाच्या रुपात जो बदल होतो,विकार होतो त्याला विभक्ती असे म्हणतात

-विभक्तीचे रूप तयार करतांना जी अक्षरे शब्दांन्ना जोडून येतात त्यांना प्रत्यय असे म्हणतात .

 

 • शब्दसिद्धी/shabdsakti :-

                                                         शब्द कसा सिद्ध होतो /बनतो याला शब्दसिद्धी असे म्हणतात. सिद्ध म्हणजे उत्पन्न होणे /निर्माण होणे .

मराठी भाषा संस्कृत -प्राकृत या भाषेपासून तयार झालेली आहे .

मराठी भाषेचे चार प्रकार पडतात

1.तत्सम भाषा /शब्द

२.तद्भव भाषा /शब्द

३.देशी भाषा /शब्द

४.परभाषिक भाषा /शब्द

 

 • सिद्ध-साधित-उपसर्ग-प्रत्यय-अभस्त्य/siddha-sadhit-upsarh-abhyasth:-

सिद्ध शब्द :-

                मुळात भाषेमध्ये काही शब्द काही वेगळ्या प्रकारचे मूळ शब्द किंवा धातू असतात त्यांना सिद्ध शब्द असे म्हणतात .

उदा . जा-ये-कर-बस-उठ-चाल-नीज-बोल-पी-खा

साधित शब्द :-

                   सिद्ध शब्दाला उपसर्ग/अथवा प्रत्यय जोडल्यास जो नवीन शब्द तयार होतो .

त्यास साधित शब्द असे म्हणतात.

उपसर्ग :-

            मूळ शब्दाच्या पूर्वी /मागे एक किंवा अधिक अक्षरे लावुं साधित शब्द तयार होतात त्यांना उपसर्ग असे म्हणतात .

मूळ शब्दाच्या मागे जी अक्षरे येतात त्यांना उपसर्ग असे म्हणतात .

 

उपसर्ग घटीत शब्द :-

                            शब्दाच्या पूर्वी/मागे उपसर्ग लावून जो शब्द  तयार होतो त्यास उपसर्ग असे म्हणतात

 

प्रत्यय :-

           शब्दाच्या किंवा धातूच्या पुढे एक किंवा अधिक अक्षरे लावून येतात त्यांना प्रत्यय असे म्हणतात शब्दाच्या किंवा धातूच्या शेवटी जे अक्षरे येतात ते प्रत्यय असते.

 

 

 • शब्दशक्ती/shabdshakti :-

                                                            आपल्या मनातील विचार अथवा भावना व्यक्त करतांना योग्य व पोषक शब्दाचा वापर करावा लागतो त्यासाठी शब्दाचा अर्थ प्रकट करण्याची एक विशिष्ट शक्ती/सामर्थ्य असते त्याला शब्दशक्ती असे म्हणतात .

शब्द्शक्तीचे तीन प्रकार पडतात

शब्दाच्या अंगी तीन शक्ती असतात

-अभिधा

– व्यंजना

-लक्षणा

 

 • क्रियाविशेषण अव्यय/Marathi Grammar Kriyavisheshan Avyay:-

                                                                                                    नामा बद्दल विशेष माहिती सांगून अथवा नामातील गुण दाखविणाऱ्या शब्दाला नाम विशेषण अथवा विशेषण असे म्हणतात परंतु क्रीयापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शंदाला क्रिया विशेषण असे म्हणतात .

क्रीयाविषेशनाबद्दल विशेष माहिती सांगून जी अविकारी राहतात त्यांना क्रिया विशेषण अव्यय असे म्हणतात .

क्रिया विशेषण हे क्रियापदाचे विशेषण असते.

 

 • शब्दयोगी अव्यय/Shabdyogi Avyay:-

जे शब्द नामाला किंवा सर्वनामाला जोडून येतात व वाक्यातील शब्दांचा संबंध दाखवितात त्यांना शब्दयोगी अव्यय असे म्हणतात .

शब्दयोगी अव्यय हे शब्द जोडण्याचे काम करतात

शब्दयोगी अव्यय हे स्वतंत्र नसतात

शब्दयोगी अव्यय हे मूळ क्रि .वि.ला जोडून येतात .

नाम + क्रि .वि.अ = शब्दयोगी अव्यय

 

 • उभयान्वयी अव्यय/Ubhyanvyayi Avyay:-

                                                                                           दोन शब्द किंवा वाक्य जोडण्याचे कार्य करणाऱ्या अव्ययास उभयान्वयी अव्यय असे म्हणतात .

उभय :- दोन

अव्यय :- संबध

लिंग ,वाचन,विभक्ती ,पुरुष यामुळे उभयान्वयी अव्य्यात बदल होत नाही म्हणून त्यास अविकारी अव्यय असे म्हणतात .

 • विरामचिन्हे/Viramchinhe:-

                                                               जेव्हा आपण संवाद  करतो त्यावेळी आपण अधूनमधून थांबा घेतो या थांब्यास “विराम” असे म्हणतात .व ज्या खुणांनी हे विराम दर्शविले जातात त्यास विरामचिन्हे सोबोधीतात .व्याक्याची रचना करतांना या विराम चिन्हाचा  उपयोग करतात .

विरामचीन्हाचे दोन प्रकार पडतात

1.विराम बोध करणारी :-पूर्णविराम अर्धविराम स्वल्पविराम

२.अर्थबोध सांगणारी :- प्रश्न चिन्ह ,उद्गारवाचक चिन्ह

 

 • वाक्याविचार/Varnvichar:-

                                                              आपण जे बोलतो टी वाक्य अर्थपूर्ण असतात प्रत्येक वाक्य अर्थपूर्ण असतात किंवा प्रत्येक वाक्य संपूर्ण विधान असते त्या वाक्याचे वेगवेगळ्या संदर्भात वेगवेगळे प्रकार पडतात .

खऱ्या अर्थाने वाक्याचे दोन प्रकार पडतात

 • अर्थावरून
 • रचनेवरून

अर्थावरून पडणारे प्रकार सहा आहेत

1.विधानार्थी वाक्य

२.होकारार्थी वाक्य

३.नकारार्थी वाक्य

४.प्रश्नार्थी वाक्य

५.उद्गारार्थी वाक्य

६.आज्ञार्थी वाक्य

रचनेनुसार पडणारे वाक्य

1.केवल वाक्य

२.संयुक्त वाक्य

३.मिश्र वाक्य

 

 

 • वाक्य परिवर्तन/Vakya Parivarkan:-

                                                                                  वाक्य परिवर्थान म्हणजे वाक्याच्या रुपात किंवा रचनेत केलेला बदल होय परंतु हे वाक्य रुपांतर /परिवर्तन वाक्याच्या मूळ अर्थाला बाधा ण आणता त्याच्या रचनेत केलेला बदल असला पाहिजे

वाक्य परिवर्तनाचे /रूपांतराचे तीन प्रकार पडतात

1.प्रश्नार्थी वाक्य व विधानार्थी वाक्य

२.उद्गारार्थी व विधानार्थी वाक्याचे रुपांतर

३.होकारार्थी व नकारार्थी वाक्याचे रुपांतर

 

 • वाक्य पृथाकरण/Vakya pruthakkaran:-

                                                                                         पृथक करण म्हणजे वाक्य वेगवेगळे करून त्याचा एकमेकाशी असणारा संबंध तपासणे .

उद्देश :– वाक्यात क्रिया करणारा जो कोणी असतो त्यास कर्ता म्हणतात /उद्देश असे म्हणतात .

उद्देश विस्तार :- कर्त्या बद्दल अधिक माहिती सांगणारा जो शब्द असतो त्यास उद्देश विस्तार असे म्हणतात .

कर्म : वाक्यातील क्रिया ज्या कोणावर घडते त्यास कर्म असे म्हणतात

कर्म विस्तार :-कर्माबद्दल अधिक माहिती सांगणारा जो शब्द असतो त्यास कर्म विस्तार म्हणतात .

विधान पूरक :-वाक्याला पूर्णता आणण्याचे काम करणारा जो शब्द असतो त्यास .विधान पूरक असे म्हणतात .

विधेय विस्तार :- क्रीयापदाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द म्हणजे क्रियाविशेषण होय तसेच शब्दयोगी अव्यय सप्तमी विभक्ती (त .ई.आ ) या सारखे शब्द विधेय विस्तारात  आलेले असतात .

विधेय :- वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द म्हणजे क्रियापद होय.

 

 • समास/marathi grammar samas in marathi:-

 दोन किंवा अधिक शब्दातील परस्पर संबंध दाखविणारे शब्द किंवा प्रत्येय याचा लोप होवून जे एक जोड शब्द तयार होतो त्या शब्दाच्या एकीकरनास समास असे म्हणतात .

शब्दाच्या एकत्रीकरणामुळे जो एक जोडशब्द तयार होतो त्या शब्दाच्या एकत्रीकर्नास किंवा त्यास सामासिक शब्द असे म्हणतात .

सामासिक शब्द कोणत्या शब्दापासून तयार झाला हे स्पष्ट करण्यासाठी त्याची फोड करून सांगणे याला आपण विग्रह असे म्हणतो  .

समासाचे एकूण चार प्रकार पडतात 

 1. अव्ययी भाव समास /avayibhav samas in marathi
 2. तत्पुरुष समास /tatpurush samas in marathi
 3. व्दद समास /dvandva samas in marathi
 4. बहुब्रीही समास/dvigu   samas in marathi

 

 • प्रयोग/marathi grammar prayog:-

  वाक्यात कार्त्याशी किंवा कर्माशी लिंग ,वाचन ,पुरुष यांच्या बाबतीत जो संबंध असतो त्यास प्रयोग असे म्हणतात .

{कर्ता + कर्म +क्रियापद +यांचा परस्पर संबंध म्हणजे प्रयोग .प्रयोग म्हणजे जोळणी }

प्रयोगाचे मुख्य तीन प्रकार पडतात 

1.कर्तरी प्रयोग /kartari prayog marathi

२.कर्मणी प्रयोग /karmani prayog marathi

. भावे प्रयोग /bhave prayog marathi/bhave prayog lakshane in marathi

 

 • वृत्त  marathi grammar vrutta/marathi vyakaran vrutta :-

आपल्या स्वाभाविक बोलण्याला गद्य असे म्हणतात .

गद्य हे वाचता येते 

गद्य मध्ये एकामागुनेक वाक्य येतात 

सुरावर किंवा चालीवर म्हणता येणारे /गाता येणारे पद्य असते 

वाक्यातील शब्द ठराविक क्रमाने लिहून ते सुरात म्हणता येयील अश्या पद्धतिने पद्याची रचना केली असते 

लयबद्ध रचनेला पद्य असे म्हणतात 

पद्यामध्ये जी विशिष्ट शब्दरचना असते त्यास/वृत्ते छंद  असे म्हणतात .

छंद म्हणजे मोकळे 

पद्य रचना सैल पद्ध तिने असेल त्यास छंद असे म्हणतात 

छंदामध्ये (ठेका ) घावयासा वाटतो .

काव्य रचनेमध्ये अक्षरगण ,मात्रा ,यती,यांचे बंधन नसते त्यातील रचना मुक्त प्रकारची असते त्यास मुक्तछंद असे म्हणतात 

प्रत्येक चरणात सारखे अक्षरे व सारखे लघु ,गुरु यांचा क्रम सारखाच असतो 

एखाद्या अक्षराचा उच्चार करतांना जो वेळ लागतो त्यास मात्रा असे म्हणतात .

लघु /गुरु याचा क्रम मांडून तीन अक्षराचा गट पडतात त्यास गण असे म्हणतात 

गान हे आठ आहेत 

कवितेचे चरण म्हणतांना मधेच थांबण्याच्या प्रकाराला यती म्हणतात .

वाक्यात अक्षराचे किंवा कवितेचे चरणात अक्षराचे व गणाचे बंधन नसते त्यास मात्रागन असे म्हणतात 

मात्रागन म्हणजे जात 

सलग वर्णन करण्याच्या प्रकाराला काटाव असे म्हणतात 

उपदेशाचे डोस पाजणे म्हणजे फटका 

परमेश्वराला हाक मारण्यासाठी म्हटल्या जाणाऱ्या भोपळ्या किंवा आरत्या असतात 

त्यान्हा मुलासाठी म्हटले जाणारे जे गीत असते त्यास अंगाई गीत असे म्हणतात .

शूर विर याच्या किंवा शहीद यांच्या साठी म्हटल्या जाणारे गीत हे पोवाडा म्हणतात .

वृताचे दोन प्र्कार पडतात 

1.अक्षरगण वृत्त 

२.मात्रागन वृत्त 

 

 • अलंकार/marathi vyakaran alankar:-

अलंकार म्हणजे दागिना ज्यामुळे शरीराची शोभा वाढते सौंदर्यात भर पडते ,माणसाची जी गोष्ट असते तीच भाषेची असते 

भाषा परिणाम कारक व प्रभावी होण्यासाठी तसेच चांगली व आकर्षक वाटण्यासाठी आपण अलंकारिक भाषा वापरतो 

ज्यामुळे भाषेला सौदर्य प्राप्त होतो ,भाषा प्रभावी ठरते त्या गुणधर्म युक्त शब्दांना भाषेचे अलंकार असे म्हणतात 

भाषेचे अलंकार दोन प्रकारात मोडतात/ Types of alankar in marathi grammar

1.शब्दा अलंकार /shabd alankar in marathi:-

                                                                                          शब्दाच्या मध्या मातून साम्य किंवा विरोध दाखवून तर कधी कधी नाद निर्माण करून जे शब्द भाषेत सौदर्य निर्माण करतात  त्यास शब्दा अलंकार म्हणतात .

शब्दा अलंकार चे तीन प्रकार पडतात 

1.अनुप्रास अलंकार /anupras alankar in marathi

२.यमक अलंकार /yamak alankar in marathi

३.श्लेष अलंकार /shlesh alankar in marathi

 

२.अर्था अलंकार/ArthaAlankar in marathi :-

जेंव्हा शब्दाच्या वेगवेगळ्या अर्थामुळे भाषेचे सौदर्य अधिक खुलून दिसते त्यास अर्थालंकार असे म्हणतात .

अर्था अलंकार खालील प्रकार पडतात 

1.उपमा अलंकार /upma alankar in marathi

२.उत्प्रेक्षा अलंकार /utpreksha alankar in marathi

३.रूपक अलंकार /rupak alankar in marathi

४.व्यक्तीरेख अलंकार /vyaktirekh alankar in marathi

५.अतिशोक्ती अलंकार /atishokti alankar in marathi

६.दृष्टान्त अलंकार /दृष्ठांत alankar in marathi

७.अन्योक्ती अलंकार /anyokti alankar in marathi

८.पर्याय वृत्त अलंकार /paryay alankar in marathi

९.सार  अलंकार /sar alankar in marathi

10.व्याजोक्ती अलंकार /vyajokti alankar in marathi

11.चेतन बुनोक्ती अलंकार/chetan bunokti  alankar in marathi

 • रस/ras:-

 • काव्याचे गुण/kavyache gun

 • अशुद्ध – शुद्ध शब्द/ashudhha -shudhha shabd

 • शुद्धलेखन/shuddhalekhan

 • समूह्दर्शक शब्द/Samuhdarshak Shabd

 • ध्वनिदर्शक शब्द/Dwanidarshak shabd

 • समानार्थी-विरुद्धार्थी शब्द-Samanarthi -Virudhharti Shabd

 • समूह्दर्शक शब्द/Samuh Darshak Shabd

 • पारिभाषिक शब्द/Paribhashik Shabd

 • मराठी म्हणी 

 

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरू नका

FACEBOOK PAGE :-WWW>FACEBOOK.COM/marathituitar

Youtube Channel :- https://www.youtube.com/channel/UCHj1Xdx6Kp4eLP61p3UKwqg

Follow On Twitter:-https://twitter.com/dmadhuj

 

 

Stay With Us

I am Marathi Grammar Tutor giving free lessons on Grammar In Marathi

Leave a Reply

Social

Stay With Us
Copyright © 2018 Marathi Grammar || Marathi Vyakaran
%d bloggers like this: